
sheli palan yojana 2024
sheli palan yojana 2024 शेली पालन योजना २०२४ महाराष्ट्र शेली पालन अनुदान योजना हि महाराष्ट्रातील शेतकरी तरुण होतकरू वर्गसाठी लाभदायक ठरू शकणारी फायदेशीर योजना आहे. महाराष्ट्र राज्यांतील गग्रामीण भागातील तरुण वर्गाला ५० ते ७० टक्के अनुदान देऊन नवीन स्वयंरोजगार उभा करण्यसाठी प्रोत्साहन देणे आणि भक्कम आधार देणे , त्या साठी आर्थिक मदत देणे हा या शेली पालन योजनेचा मुख्य उद्देश आहे . हा पशु पालन स्वरूपातील व्यवसाय करण्यसाठी मोठ्या प्रमाणात निधीची , भांडवलाची आवश्यकता असते . महाराष्ट्र शासनाने या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून या योजनेत लाभार्थी ठरणाऱ्या भरघोस अनुदान देऊन आर्थिक मदत करण्याचे शासनाने ठरवले आहे .
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि शेतकरी वर्गाला एक हक्काचा जोडधंदा मिळावा हा योजनेचा मुख्य उद्देश आहे . या शेली पालन योजनेत १० शेळी आणि १ बोकड प्रजनन क्षम आपल्या स्थानिक वातावरणात नैसर्गिक रित्या तग धरू शकेल अशा प्रजांतीचा या मध्ये समावेश केला जाईल . या योजनेतील बद्दल आवश्यक असणारी सर्व माहिती , योजनेचा लाभ घेण्यसाठी आवश्यक असणारी पात्रता , योजने मध्ये होणारी लाभार्थी निवड , योजनेत लाभार्थी होण्यसाठी अथवा योजनेत अर्ज करण्यसाठी लागणारी कागपत्रे यांच्या बद्दल सखोल माहिती आपल्याला या लेखातून मिळेल .
वाचकांनी हि माहिती आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त पोहचावी जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईक्ल .
sheli palan yojana 2024 शेळी पालन योजना 2024 स्वरूप :
शेतकरी वर्गातील तरुणांना जोडधंदा मिळावा व आर्थिक उत्पन्न मध्ये वाढ व्हावी असा प्राथमिक उद्देश या योजनेचा आहे . या योजने मार्फत शेतकरी बांधवाना १० शेळी आणि १ बोकड खरेदी करण्यसाठी अनुदान दिले जाणार आहे . या प्रजनन क्षम शेळी आणि बोकड यांच्या माध्यमातून पुढील शेळ्यांची पैदास होईल . व शेतकरी वर्गाला पशुपालन हा जोड धंदा सुरु करता येईल . sheli palan anudan yojana maharashtra 2024
- या योजने मधून सुरवातीला १० शेली आणि १ बोकड यांसाठी अनुदान दिले जाईल .त्यानंतर च्या शेळ्या व बोकड खरेदी कण्यासाठी अनुदान दिले जाणार नाही .
- लाभार्थी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मधील असल्यास या योजने मार्फतशेळी व बोकड खरेदी करण्यसाठी ७५ % अनुदान दिले जाईल .
- लाभार्थी जर खुल्या वर्गातीनया योजनेचा लाभ घेत असल्यास ५० %अनुदान हे शेळी व बोकड खरेदी करण्यासाठी या योजनेतून दिले जाईल .
- या योजनेतून शासनातर्फे ५०% ते ७०% अनुदान दिले जाईल . आणि उर्वरित रक्कम लाभार्थी शेतकर्यांना स्वतः भरावी लागेल .
- शे,शेळ्या व बोकड खरेदी केल्यावर खरेदी च्या जागेवरून घरा पर्यंत वाहतूक करून नेण्याची जबाबदारी लाभार्थी शेतकर्याची असेल .
- या योजनेत शेळ्या व बोकड खरेदी करताना प्रजाती ठरवण्याची जबाबदारी शेतकर्याची असेल .
- या योजने मार्फत फक्त शेळ्या आणि बोकड खरेदी करता अनुदान दिले जाईल . त्या नंतरच्या काळातील औषध शेळ्यांच्या औषध उपचारासाठी अनुदान दिले जाणर नाही ती जबाबदारी पूर्ण पणे लाभार्थी शेतकर्याची असेल .
sheli palan yojana 2024 शेळी पालन योजना 2024 उद्देश:
शेतकरी बांधवाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि त्यांना नवीनं जोडधंदा सुरु करण्यसाठी आर्थिक मदत देणे हा या शेळी पालन योजनेचा मुख्य उद्देश आहे . त्याच बरोबर महारष्ट्रातील पशुपालन व्यवसाय हि वाढीस लागेल आणि पशुपालन व्यवसाय संबंधी नवनवीन संशोधन हि होईल अशी अपेक्षा हि आहे .
- महाराष्ट्र राज्यातील हवामान हे पशुपालन विशेष करून शेळीपालन व्यवसाय करण्यसाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून शेतकरी बांधवाना शेळी पालन व्यवसाय करण्यसाठी प्रोत्साहित करणे .
- शेळी पालन , मेंढी पालन , बोकड पालन या व्यवसायांना चालना देणे .
- शेळीपालन व पशुपालन हा जोद्ध्नदा करण्यसाठी शेतकरी बांधवाना प्रोत्साहित करणे .
- महाराष्ट्र राज्यातील शेळीपालन व्यवसायत संशोधन करून विविध शेळीच्या प्रजातींचा अभ्यास करणे .
- शेतकरी बांधवानी शेती सोबत जोड धंदाकरावा यासाठी प्रयत्न .
- शेतकरी बांधवांचे आर्थिक उत्पन वाढवणे व शेतकरी कुटुबांचे जीवनमान उंचावणे .

sheli palan yojana 2024 शेळी पालन योजना 2024 उद्दिष्टे :
sheli palan anudan yojana maharshtra 2024
- शेळी पालन करू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवाना भरघोस मदत करणे हे शेळी पालन योजना सुरु करण्या मागील प्राथमिक उद्दिष्ट आहे .
- शेतकरी बांधवाना जोडधंदा करायची इच्छा असते पण आर्थिक भांडवलाच्या कमतरते मुळे शेतकरी बांधवाना जोडधंदा करता येत नाही म्हणून पशुपालन हा जोडधंदा समजून त्या साठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट .
- पशुपालन हा शेतकरी बांधवांसाठी नैसर्गिक जोडधंदा आहे म्हणून पशुपालन व्यवसायातील एक भाग शेळी पालन यासठी भरघोस भांडवलाची उपलब्धी करून शेळी पालन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करणे .
- महाराष्ट्र राज्यातील हवामान हे शेळ्या आणि मेंढ्या यांच्या साठी अत्यंत पोषक आहे . या योजनेतून मोठ्या प्रमाणत शेतकर्यांना मदत करून शेळीपालन व्यवसाय वाढीस लावणे आणि त्याच्या माध्यमातून शेळीपालन व्यवसायात संशोधन करणे .
- महारष्ट्र राज्याचा विस्तार हा खूप मोठा आहे कोकण किनार पट्टीपासून ते विधर्भ आणि खानदेश पासून पश्चिम महाराष्ट्र पर्यंत महारष्ट्र राज्याचा विस्तार जालेला आहे . म्हणून महाराष्ट्र राज्याच्या सर्व भागात नैसर्गिक रित्या तग धरू शकेल अशा शेळीच्या प्रजातींचा शोध घेणे आणि संशोधन करणे .
शेळी पालन योजना 2024 लाभार्थी निवड : sheli palan yojana 2024
शेळी पालन योजनेची अंमल बजावणी पंचायत समिती मार्फत केली जात आहे . महाराष्ट राज्यात कायमचे रहिवासी असणाऱ्या नागीरीकाना च फक्त या योजनेचा लाभ घेता येणार आहे . महाराष्ट्र राज्यातील एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच यास योजनेचा लाब्व्ह घेता येईल. योजनेत लाभार्थी ठरण्यासाठी अर्जदाराने वय वर्ष १८ पूर्ण असणे आवश्यक आहे .
- अर्जदाराने शेळ्या मेंढ्या पालनाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्या अर्जदाराचा प्राधान्याने विचार केला जाऊ शकतो
- अर्जदाराने या आधी महाराष्ट्र राज्यात कोठेही शेळी पालन संबधित योजनेचा लाभ घेतलेला असू नये .
- अर्दाराच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराचे उत्पन्न दारिद्र्य रेषेखाली असल्यास त्या अर्जदाराला प्राधान्य दिले जाईल .
- अर्जदाराकडे पशुपालन करण्यसाठी स्वताची आवश्यक जागा अवासी .
- अर्जदार अल्प भूधारक शेतकरी असल्यास त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल .
- अर्ज्दारांमध्ये बचत गटातील महिला असल्यास त्यांना या योजनेत प्राधन्य दिले जाऊ शकते.
शेळी पालन योजना 2024 अर्ज करण्यसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे :
- ओळखीचा पुरावा म्हणून अर्जदाराचे आधार कार्ड आवश्यक .
- अर्जदाराचा कायमचा पत्ता समजण्यासाठी अर्जदाराचा रहिवासी दाखला आवश्यक .
- अर्जदाराने शेळी पालन अथवा मेंढी पालन व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक .
- लाभार्थी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मधील असल्यास त्या लाभार्थी कडे जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे .
- दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना या योजनेत प्राधान्य असल्यामुळे अर्जदाराचा उत्पन दाखला आवश्यक .
शेळी पालन योजने साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे sheli palan yojana 2024
सर्व प्रथम शेळी पालन योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घ्यावा तो अर्ज संपूर्ण भरून वर दिलेल्या यादी प्रमाणे कागपत्रे जोडून अर्ज ग्राम पंचायत कार्यालाय्त जमा करावा . ग्राम पंचायती मधून तो अर्ज पंचायत समिती मध्ये पाठवला जातो व पंचायत समिती आलेल्या अर्जांची पाहणी करून लाभार्थी नागरिकांची निवड करते .
सतत विचारले जाणारे प्रश्न FAQ
१ . शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यसाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे का ?
= शेळी पालन अनुदान योजना हि महराष्ट्र शासन मार्फत राबविली जात असल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यसाठी अर्जदार महाराष्ट्र राज्यातील कायमचा रहिवासी असणे बंधनकारक आहे .
२. शेळी पालन अनुदान योजनेचा लाभ एका कुटुंबातील किती व्यक्तींना घेता येऊ शकतो ?
= शेळी पालन योजनेच्या नियमां नुसार या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच घेता येईल .
३. शेळी पालन अनुदान योजनेत दिले जाणारे अनुदान हेसरसकट सर्वाना ७५ % आहे का ?
=शेळी पालन योजनेमार्फत शेळ्या खरेदी करण्यसाठी देण्यात येणारे अनुदान हे खुल्या वर्गासाठी ५० % आहे तर अनिसुचीत आणि अनुसूचित जमाती मधील अर्जदारांसाठी अनुदान टक्केवारी ७५ % आहे.
४ . शेळीपालन योजने मार्फत शेळ्यांची खरेदी केल्या नंतर पुढील काळात शेळ्या शेळ्यांचे संगोपन आणि औषध उपचार या साठीची तरतूद यास योजनेत आहे का ?
= शेळी पालन योजना हि फक्त शेळ्या च्या खरेदी साठी आहे त्यानंतर च्या देखभाल आणि औषध उपचाराची संपूर्ण जबाबदारी लाभार्थ्याची असेल .
५ . शेळीपालन योजने मार्फत शेळ्या खरेदी केल्या नंतर त्या शेळ्यांच्या वाहतुकीचा खर्च शासना कडून दिला जाईल का
= शेळी पालन योजना हि फक्त शेळ्यांच्या खरेदी साठी भांडवल पुरवते शेळ्यांच्या खरेदी नंतर शेळ्यांच्या खरेदीच्या जागेपासून संगोपनाच्या जागे पर्यंत नेण्याची जबाबदारी हि लाभार्थ्याची असेल .
६ . शेळी पालन योजने मार्फत शेळ्या खरेदी केल्या नंतर त्या शेळ्यांच्या संगोपनासाठी गोठा बांधून देण्या साठी शासन तर्फे मदत मिळेल का ?
= शेळी पालन योजना हि फक्त शेळ्या खरेदी साठी भांडवलात अनुदान देण्या पुरती आहे . त्या नंतरची शेळ्यांच्या संगोपानाची संपूर्ण जबाबदारी हि लाभार्थी शेतकर्याची आहे .
महाराष्ट्र शासनाच्या रोजगार संगम योजनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्याच्या लेक लाडकी योजनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजनेची शहरी व ग्रामीण संपूर्ण माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री उज्वला योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा
प्रधान मंत्री मातृत्व वंदन योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा