WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

magel tyala vihir 2024| मागेल त्याला विहीर

magel tyala vihir 2024 in marathi

magel tyala vihir 2024

magel tyala vihir 2024 : शेतकरी मित्रांसाठी शेती करताना पाणी पुरवठा हा मुख्य विषय असतो .आणि पाणी पुरवठ्या साठी शेतकरी बोरवेल , पाईपलाईन , अशा स्रोतांवर शेतकरी बांधवाना अवलंबून राहावे लागते . तसेच काहीवेळा बारमाही बागायती शेती असल्यास जास्त पाण्याची गरज शेतकरी बांधवाना असते . बारमाही पाणी पुरवठा बोरेवेल , नदी ,कॅनल यामधून केला जाऊ शकत नाही म्हणून काही वेळा शेतकरी बांधवाना पाण्य्साठी विहीर हा स्रोत चांगला वाटतो पण विहीर खोडण हे एक मोठे खर्चिक काम असते म्हणून शेतकरी इच्छा असूनही विहीर बांधायचा विचार करत नाही . म्हणून महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला विहीर हि महत्व्कांशी योजना सुरु केली आहे .

मागेल त्याला विहीर योजनेच्या माध्यमातून विहीर बांधण्याची इच्छा असणार्या शेतकरी बांधवाना विहीर खोदण्यासाठी अनुदान देण्याचे शासनाने ठरवले आहे . त्यातून शेतकरी बांधवाना विहीर खोदण्यासाठी मोठी आर्थिक मदत होणार आहे आणि शेतकरी बांधवाना बारमाही स्वस्तात पाण्याची सोय त्यातून होऊ शकेल . व ती दीर्घकालीन शेतकरी बांधवांची पाण्याची गरज भागवेल .

magel tyala vihir 2024 मागेल त्याला विहीर योजना स्वरूप :

शेतकरी बांधवाना मागेल त्याला शेततळे प्रमाणेच मागेल त्याला विहीर हि एक अनुदान देणारी योजना आहे . शेतकरी बांधवांसाठी महारष्ट्रात दुष्काळ हि एक फार मोठी समस्या आहे. आणि पावसाच्या प्रमाणात होणारी चढ उतारआणि पावसाळाच्या दिवसांमध्ये होणारे बदल शेती हि बदलत्या हवामामुळे पावसाच्या पाण्यावर करणे शक्य नाही . आणि शेत मालाची गरज हि दिवसेंदिवस वाढतच आहे . शेतमालाच्या वाढत्या मागणीमुळे महागाई होण्याचा धोक्क़ा असतो आणि शेतकरी बांधवाचे कृषी विषयक आर्थिक गणित बिघडण्याचा धोका असतो . शेतकरी बांधवांमध्ये स्पर्धा मिर्माण होऊन बाजारभाव कमी होण्याचा धोका असतो . म्हणून शेतकरी बांधवांचे आर्थिक गाणी स्थिर करणे व शेतीतून बारमाही स्वरुपात कमी खर्चात पाणीपुरवठा करता यावा यासाठी शेतकरी बांधवाना विहीर खोदण्यासाठी अनुदान देण्याचे शासनाने ठरवले आहे . त्यातून शेतकरी बांधवांसाठी महारष्ट्र राज्य शासनाने ,मागेल त्याला शेततळे हि योजना सुरु केली आहे .

मागेल त्याला विहीर योजना उद्दिष्टे : magel tyala vihir 2024

  • राज्यातील शेतकरी बांधवाना बारमाही शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करणे आणि मुबलक प्रमाणत पाण्याचा पुरवठा करून शेतकरी बांधवांचे शेतीतील कामाचे दिवस वाढवणे .
  • महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवर अवलबून आहे .पावसाच्या पाण्यावर शेती असल्यास शेतकरी बांधवाना हंगामी रोजगार प्राप्त होतो . हा रोजगार हंगामी स्वरूपाचा न राहता वर्षभर चालणारा र्रोजगार व्हावा यासाठी शेतकरी बांधवाना बारमाही पाण्याची सोय करून देणे जेणेकरून शेतकरी वर्षभर शेती करू शेकतील .
  • शेतकरी बांधवाना वेगवेगळे जोडधंदे करण्याची इच्छा असते पण ग्रामीण भागातील जोडधंदे उदा .पशुपालन , कोंबडीपालन, नैसर्गिक खते निर्मिती इत्यादी व्यवसायांसाठी मुबलक प्रमाणत पाण्याची उपलब्धता आवश्यक असते . अशा जोडधंदे करण्यसाठी आवश्यक असलेली शेतकरी बांधवांची पाण्याची गरज पूर्ण करणे .
  • एकापेक्षा अधिक शेतकरी एकत्र येऊन विहीर खोदणार असतील तर त्यांना प्रोत्साहित करून समूह शेतीला प्राधन्य देणे व समूह शेती विकास व संशोधन करणे .
  • शेतीसाठी बारमाही हकाचा पाण्याचा स्रोत शेतकरी बांधवाना उपलब्ध करून देणे . व पाण्यामुळे होणारे शेतीचे नुकसान कमी करणे .
magel tyala vihir 2024

magel tyala vihir 2024 मागेल त्याला विहीर योजना वैशिष्टे :

  • मागेल त्याला विहीर योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवाना विहीर बांधण्याय्साठी ४ लाख रुपये अनुदान मिळणार आहे .
  • गाबातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवाना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून गावातील विहिरींच्या लाभार्थी संख्ये वरील मर्यादा काढून टाकली आहे . जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थीं शेतकरी बांधवाना योजनेचा लाभ घेता येईल .
  • मागेल त्याला विहीर योजनेमध्ये विहीर खोद्ण्यसाठी मिळणारे अनुदान हे महात्मा गांधी रोजगार हमी योजने मार्फत लाभार्थी शेतकरी बांधवाना मिळणार आहे .
  • विहीर खोद्ण्यसाठी मिळणारे अनुदान magel tyala vihir 2024: DBT प्रणाली द्वारे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणी मध्ये गतिमानता असेल .
  • लाभार्थी शेतकरी बांधवाने जर यापूर्वी मागेल त्याला शेततळे किंवा मागेल त्याला विहीर योजनेचा लाभ घेतला असल्यास त्या लाभार्थी शेतकरी बांधवाना मागेल याला विहीर योजनेचा लाभ घेता येणार नाही .
योजना संपूर्ण नाव मागेल त्याला विहीर योजना
योजना कोणाची योजना स्तर महाराष्ट्र शासन
योजना लाभार्थी महराष्ट्रातील शेतकरी
योजनेतून मिळणारे अनुदान जास्तीत जास्त ४ लाख रुपये
विभाग कृषी विभाग महाराष्ट्र शासन
योजनेचा उद्देश शेतकरी बांधवाना विहीर खोदण्यासाठी सहाय्य करणे
योजने साठी अर्ज करण्याची पद्धत online / ofline
magel tyala vihir 2024

मागेल त्याला विहीर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

मागेल त्याला विहीर योजनेसाठी online आणि ofline दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो .

online पद्धतीने मोबाईल वरून सुधा या योजनेसाठी अर्ज करता येतो . यासाठी मोबाईल वर एक स्वतंत्र ऑप विकसित केलेले आहे. ते ऑप आपल्याला PLAY STORE वर सहज उपलब्ध होते .

मागेल त्याला विहीर योजना app

आप मध्ये आपला email id मोबाईल नं टाकून नवीन लाभार्थी नोंदणी करून घ्या .

या ठिकाणी लाभार्थ्याला स्वताची संपूर्ण माहिती रहिवासी पत्ता रहिवासी गाव , तालुका ,जिल्हा वरील वयक्तिक माहिती भरून जाल्यावर लाभार्थी शेतकर्याची रोजगार हमी योजना जॉबकार्ड नं टाकून जॉबकार्ड ची माहिती भरावी . व जॉब कार्ड चा फोटो हि अपलोड करायचा आहे .

लाभार्थी कोणत्या प्रवर्गातील आहे ते निवडा

8 अ नुसार शेतकर्याची जमीन किती आहे याची माहिती टाका .

विहीर ज्या ठिकाणी खोदायची आहे त्या शेताचा / जमिनीचा भूमापन क्रमांक टाकावा .

वरील भरलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून पुढे जा .

पुढे तुम्हाला प्रपत्र अ संमती पत्र तुमच्या समोर येईल .

पेज च्या शेवटी अर्ज जमा करा असा पर्याय तुमच्या समोर येईल . तिथून अर्ज जमा करावा .

अर्ज भरताना आपण जो मोबाईल नं दिला आहे त्यावर १ OTP येईल तो OTP लिहून अर्ज जमा करावा

अर्ज जमा जाल्या बद्दल धन्यवाद असा MESSAGE येईल .

महाराष्ट्र राज्याचा रोजगार संगम योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री आवास योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्याच्या लेक लाडकी योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या शेळी पालन योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा

पिएम किसान सन्मान निधी योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या शिलाई मशीन योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री उज्वला योजनेची संपूर्ण माहिती घेण्यसाठी येथे क्लिक करा